#MeToo : लैंगिक शोषणाच्या आरोपांवर राजकुमार हिरानींचे स्पष्टीकरण…!

राजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. ‘संजू’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शिका असलेल्या महिलेने हा आरोप केला आहे. हा आरोप हिरानी यांनी फेटाळला असून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे.

मात्र हिरानी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सोबतच या प्रकरणाच्या पूर्ण चौकशीसाठी देखील तयार असल्याचे हिरानी यांनी म्हटलं आहे. याबाबत हिरानी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “दोन महिन्यांपूर्वी मला या आरोपाबद्दल समजलं तेव्हा मला धक्का बसला. मी त्याच वेळी सांगितलं होतं की या प्रकरणाच्या चौकशीसाठी एखादी समिती किंवा कायद्याची मदती घेतली जावी. तरीही तक्रारदार महिलेने ही गोष्ट मीडियासमोर आणण्याचा निर्णय घेतला. पण मला स्पष्ट करायचं आहे की, हा आरोप खोटा, दुर्दैवी असून याचा उद्देश केवळ माझी प्रतिमा मलिन करणे हाच आहे,” असं हिरानी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like