निया शर्माला मिळाली ‘या’ मोठ्या शोची ऑफर

“बिग बॉस 14’च्या टायमिंग, प्रीमियर डेट, कंटेस्टेंट्‌सची नावे आणि शोच्या थीम-फॉर्मेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्साहित आहेत. या शोसाठी अनेक सेलिब्रिटींकडे संपर्क साधण्यात येत आहे. सलमान खानच्या शोसाठी नागिन फेम अभिनेत्री निया शर्मा आणि अभिनेता विवियन डिसेना यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे.

सलमान खानच या रियलिटी शोच्या 14व्या सीझनचे आयोजन करणार आहे. या शोच्या शूटिंगला सप्टेंबरमध्ये सुरुवात होऊ शकतेअसे सांगण्यात येत आहे. विवियन डिसेना आणि निया शर्मा यांच्यासह अनेक सेलेब्रिटींशी चर्चा सुरू आहेत.

हे दोन्ही कलाकार छोटया पडद्यावरील स्टार कलाकार आहे. या दोघांच्या आगमनाने शोल निश्‍चितच फायदा होईल. दुसरीकडे सुष्मिता सेनचा भाऊ राजीव यांचेही नाव चर्चेत आहे. आता “बिग बॉस 14’मध्ये या तीन सेलेब्सपैकी कोणत्या सेलेब्सचा सहभाग असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दुसरीकडे “बिग बॉस 14’ची थीम खूप खास असणार आहे. या लॉकडाउन कनेक्‍शन पाहिले जाऊ शकते. शोच्या स्वरूपात सोशल डिस्टेंसिंग देखील महत्त्वपूर्ण असेल. तसेच “बिग बॉस 14 : एडिशन’ अशी 14 व्या सीझनची टॅगलाइन असू शकते. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांनी मोबाइल फोन ठेवण्याची ही पहिली वेळ असेल. एकंदरीत, बिग बॉसचा 14व्या सीझनमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी बघायला मिळणार आहे.

You might also like