‘मी पण सचिन’चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित

‘मी पण सचिन’ हा चित्रपट १ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्नील जोशी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात स्वप्नील ‘सचिन पाटील’ नावाच्या एका ध्येयवादी माणसाची भूमिका साकारत आहे. आता चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

खेळ असो, नाहीतर आयुष्य, शेवटचा टप्पा पडल्याशिवाय कधीही हार मानायची नाही, असा प्रेरणादायी संदेश या टीझरमधून देण्यात येत आहे. गावात राहूनही लंडनच्या लॉर्ड्स ग्राउंडवर क्रिकेट खेळण्याचं स्वप्न उराशी बाळगून, त्या मार्गानं प्रयत्न करणाऱ्या स्वप्निलच्या आयुष्यात काही विचित्र घडामोडी घडत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे स्वप्नीलचं हे स्वप्न पूर्ण होतंय, की अधुरं राहतंय, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

हा चित्रपट फक्त क्रिकेट वरच आधारित नाहीये. ह्या चित्रपटात क्रिकेट आणि आयुष्य यांना एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून दाखवल्या आहेत. असे मत स्वप्नील ने मांडले. “इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित ‘मी पण सचिन’ चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like