चेक बाऊन्स प्रकरणी कोयना मित्राला सहा महिन्यांचा तुरुंगवास

चेक बाऊन्स केल्या प्रकरणी कोयना मित्राला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मॉडेल पूनम सेठीने  कोयना मित्रा विरोधात तक्रार केली होती. ज्या तक्रारीनंतर १ लाख ६४ हजारांच्या व्याजासह एकूण ४ लाख ६४ हजार रुपये देण्यात यावेत असे आदेशही दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत.

पूनम सेठीने २०१३ मध्ये कोयना मित्राविरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान हे सगळे प्रकरण खोटे असून मला यात गोवले गेल्याचे कोयनाने म्हटले आहे.

सुनावणीच्या वेळी माझे वकील न्यायालयात हजर होऊ शकले नाहीत त्यामुळे माझी बाजू न्यायालयाने ऐकून घेतली नाही. माझी बाजू ऐकून न घेताच मला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे असेही कोयनाने म्हटले आहे.