अंगावर शहारा आणणारं मणिकर्णिकाचे ‘मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए’ गाणे प्रदर्शित…..

कंगना राणौतचा मणिकर्णिका चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील दुसरं गाणं नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे . मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए, असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला कमी कलावधीतच खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
या गाण्याला संगीत शंकर एहसान लॉयने दिले आहे. तर गाण्याचे बोल प्रसून जोशी यांनी लिहिले आहेत. गाण्याचे शूट ऐतिहासिक लोकेशन्सवर करण्यात आले आहे. या गाण्यात राणी लक्ष्मीबाईं यांचे बालपणापासून लढाईपर्यंतचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे. ‘मणिकर्णिका’ हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.