‘बाहुबली’मधील ‘हा’ अभिनेता झळकणार हॉलिवूड मध्ये ?

राणा डग्गुबती म्हणजेच बाहुबली चित्रपटातील ‘भल्लालदेव’ने खलनायकी भूमिकेतूनही प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली होती. टॉलिवूड आणि बॉलिवूडनंतर आता राणा हॉलिवूडसाठी सज्ज झाला आहे.

एका हॉलिवूड चित्रपट निर्मात्यासोबत राणाशी चर्चा सुरू असून त्याच्या चित्रपटात तो काम करण्याबाबत सकारात्मक विचार करत आहे. ‘काही हॉलिवूड चित्रपट निर्मात्यांनी राणाची भेट घेतली असून एखादी स्क्रिप्ट आणि भूमिका आवडल्यास तो नक्कीच विचार करेल,’ अशी माहिती राणाच्या जवळच्या व्यक्तीने एका वेब साइटला दिली आहे.

सध्या राणा त्याच्या आगामी ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर कदाचित तो हॉलिवूड चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –