अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाहसोहळ्यात अनेक कलाकारांची मंदियाळी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे आज म्हणजेच २७ जानेवारी  रोजी विवाहबंधनात अडकले. या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर हजर राहणार आहेत. लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

दोन दिवसांपासून कृष्णकुंज इमारतीला आणि इतर परिसराला रोषणाई करण्यात आली आहे.काल म्हणजेच २६ जानेवारी रोजी संध्याकाळी राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंज येथे नातेवाईकांच्या उपस्थितीत हळदीचा कार्यक्रम पार पडला.

या विविह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी, आशिष शेलार, प्रसाद लाड यांची उपस्थिती असणार आहे. तसेच अंबानी परिवार आणि रतन टाटा हे देखील उपस्थित राहणार आहेत.चित्रपट सृष्टीतील आमिर खान,साजिद खान, रितेश देशमुख , अशा भोसले , भरती आचरेकर , अतुल परचुरे ,सुनील बर्वे ,क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सह अनेक बॉलिवूडमधील कलाकारही या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

गेल्याच वर्षी गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांचाही साखरपुडा पार पडला. मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. मिताली बोरुडेने फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. ती प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like