तापसी पन्नू ‘या’ चित्रपटातून बाहेर

तापसी पन्नू या वर्षांत आणखी एक दमदार चित्रपट घेऊन येणार होती. पण अचानक या चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. कार्तिक आर्यन सोबत ‘पति पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये तापसी पन्नूची वर्णी लागली होती. पण आता तापसीला बाद करत, दुसया अभिनेत्रीला साईन केले. विशेष म्हणजे, याबद्दल तापसीला कुठलीही कल्पना देण्यात आली आहे.

मुंबई मिररशी बोलताना तापसीने या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. मला अगदी शेवटच्या क्षणी निर्मात्यांनी आपला निर्णय कळवला. दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांनी मला चित्रपटातून का काढण्यात आले, याबद्दल काहीही सांगितले नाही. केवळ तुझ्याजागी दुसरी अभिनेत्री निवडली गेलीय, एवढेच त्यांनी मला सांगितले. मी निर्मात्यांशीही बोलले पण त्यांच्याकडून कुठलेच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. शिवाय माझे शेड्यूलही बिघडले. यानंतर कुठलाही चित्रपट साईन करण्यापूर्वी मी चारदा विचार करेल. ‘पति पत्नी और वो’ने माझे डोळे उघडले, असे तापसी म्हणाली.

तापसीच्या जागी अभिनेत्री अनन्या पांडेला या चित्रपटासाठी साईन करण्यात आल्याची खबर आहे. अर्थात याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही.

महत्वाच्या बातम्या –

You might also like