‘बिग बॉस’च्या घरात होणार ‘या’ सेलिब्रिटींची एण्ट्री?

वादग्रस्त व तितकाच लोकप्रिय शो ‘बिग बॉस’चा चौदावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात हा शो सुरु होणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात कोणत्या सेलिब्रिटींची एण्ट्री होणार याची उत्सुकता आहे. यंदाच्या सिझनसाठी तीन सेलिब्रिटींची नावं खूप चर्चेत आहेत.

बिग बॉससाठी निया शर्मा व विवियन डिसेना यांची नावं चर्चेत आहेत. तर शेखर सुमन यांचा मुलगा व अभिनेता अध्ययन सुमन यालासुद्धा विचारण्यात आल्याचं समजतंय. ‘राज ३’ या चित्रपटात अध्ययन झळकला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अध्ययन व कंगना रणौत यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. निया  ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नियाने आशियातील सर्वांत सेक्सी महिलांच्या यादीत तिने दोन वेळा स्थान मिळवलं होतं.

दुसरीकडे विवियनने ‘शक्ती – अस्तित्त्व के एहसास की’, ‘प्यार की ये एक कहानी’, ‘मधुबाला- एक इश्क एक जुनून’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.‘बिग बॉस’चा तेरावा सिझन फार चर्चेत होता. टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने शोचं विजेतेपद जिंकलं होतं. तर असिम रियाज आणि शहनाज गिल दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते.

‘लागिरं झालं जी’ मधल्या भैय्यासाहेबांनी लॉकडाऊन मध्ये उरकलं लग्न ?

You might also like