पाहा व्हिडिओ, शेवंताच्या घरी आलीय एक ‘Cool लक्ष्मी’

शेवंता म्हणून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर .अपूर्वा नेहमीच सोशल मिडीयावरुन चाहत्यांशी संपर्क साधते. आता अपूर्वानेही तिचं युट्यूब चॅनेल सुरु केलंय . या माध्यमातून ती धम्माल व्हिडीओ घेऊन चाहत्यांच्या भेटीला येते.
खवचट जयश्री काकू म्हणून धम्माल उडवल्यालंतर आता अपूर्वाकडे आलीय cool लक्ष्मी. यात एका म्हाता-या पण कूल स्वभावाच्या या भन्नाट आज्जीला पाहून तुम्हीही खळखळून हसणार यात शंका नाही. अपूर्वाचा हा coolलक्ष्मी स्टाईल स्पेशल व्हिडीओ पाहून तुमचीही हसून हसून पुरेवाट लागेल याची खात्री आहे.