‘तांडव’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

‘तांडव’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. महिला सबलीकरणाच्या अनेक गोष्टी आपण केवळ बोलतो, परंतु त्यावर आधारीत तांडव या मराठी चित्रपटाची निर्मिती सुभाष गणपतराव काकडे यांनी केली आहे. चित्रपटाची मूळ संकल्पना रामेश्वर काकडे यांची आहे.

सिनेमाचा ट्रेलर बघितल्यावर असे वाटते की, चित्रपटामध्ये ऑक्शन, नाटक, सस्पेंस खूप मोठ्या प्रमाणात आहे. या सिनेमामध्ये नील राजूरीकरने सुद्धा अफ़लातून भूमिका साकारली आहे. तर सयाजी शिंदे यांनी विरोधकाची भूमिका चोख बजावली आहे. चित्रपटामध्ये पूजाने लढाई कशी करायची, विरोधकांचा कसा पडदा फाश करायचा याचे उत्तम उदाहरण तिने दिले आहे.

महिलांच्या सर्वच क्षेत्रातील उत्तुंग अशा कामगिरीबद्दल नेहमीच बोलले जाते, परंतु यावर आधारीत नायिकाप्रधान चित्रपट क्वचितच प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तांडव हा सिनेमा महिलांना प्रेरणादायी ठरेल अशी आम्ही आशा बाळगतो.