कतरिना कैफ सोबत ‘या’ चित्रपटात झळकणार ईशान खट्टर

रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यातूनच त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.

अलीकडेच त्यांनी आणखी काही शो आणि चित्रपटांसह ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मवर यश मिळाले आहे. या यादीत आणखी एक नाव जोडत एक्‍सेलने आपल्या आगामी “फोन भूत’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटात कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर मुख्य भूमिका साकारत आहेत.

 

या चित्रपटात हे तिन्ही कलाकार एका भूताचा पाठलाग करताना दिसणार आहेत. कतरिना, ईशान आणि सिद्धांतने त्यांच्या या चित्रपटाचा पहिला लूक शेअर करण्यात आला आहे. या लूकला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

2019मध्ये सुपरहिट ठरलेला “गली बॉय’ आणि बॉक्‍सिंगवर आधारित असलेल्या आगामी “तूफान’ चित्रपटानंतर “फोन भूत’ ही एक्‍सेलची महत्त्वपूर्ण घोषणा आहे. गुरमीत सिंग दिग्दर्शित रवीशंकरन आणि जसविंदरसिंग बाथ यांनी पटकथ लिहिलेली आहे. या चित्रपटाचे शूटिंग या वर्षाअखेर सुरू होणार असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

 

You might also like