‘…तर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा २५ जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. पण या सिनेमाला आता संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

या सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पायात पादत्राणं घालून पुष्पहार अर्पण करताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे सिनेमातील हे दृश्य छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारा आहे.

सिनेमातील हे दृश्य निर्माता आणि दिग्दर्शक यांनी तात्काळ वगळावे अन्यथा या दृश्यासह सिनेमा जर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात एकाही ठिकाणी हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like