स्पृहा जोशीने आपल्या कुटूंबियांसोबत केले श्रमदान

स्पृहा जोशीला सामाजिक घडामोडी आणि विषयांसदर्भात असलेली संवेदनशीलताही वेळोवेळी दिसून आलीय. स्पृहा सोबतच तिचे कुटूंबियही सामाजिक कार्याविषयी किती सजग आहे, हे यंदा महाराष्ट्र दिनी दिसून आले. 1 मे रोजी स्पृहा जोशीने आपल्या आई आणि काकूसह सिन्नर तालुक्यातल्या धोंडबार गावात पाणी फाउंडेशनच्या श्रमदानामध्ये सक्रिय सहभाग घेतला.