पाहा सोनाक्षीचा ‘टोटल धमाल’ मधील ‘मुंगडा’ अवतार

काही दिवसांपूर्वी ‘टोटल धमाल’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर सिनेमातलं ‘पैसा ये पैसा’ गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. आता याच सिनेमातील आणखी एक रिमिक्स गाणं प्रदर्शित झालंय.
१९७८ साली आलेल्या हेलन यांच्या ‘मुंगडा’ या गाण्याला पुन्हा एका नव्या स्वरुपात प्रेक्षकांसमोर आणण्यात आलंय. आणि या गाण्यात सोनाक्षी सिन्हा दिसतेय.
‘टोटल धमाल’ हा सिनेमा येत्या २२ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. कॉमेडी सिनेमाच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. कारण या सिनेमात अजय देवगन, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, जॉनी लिवर, अर्शद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख आणि संजय मिश्रा यांच्या मस्तीखोर भूमिका आहेत.
महत्वाच्या बातम्या –