लवकरच सुरु होणार ‘दबंग 3’चे शूटिंग, अरबाज खानने केले कन्फर्म

सलमान खानच्या फॅन्ससाठी 2019 हे वर्ष खूप स्पेशल असणार आहे कारण सलमानचा ‘भारत’ सिनेमा रिलीज होणार आहे आणि त्याच बरोबर दबंगच्या तिसऱ्या भागाची शूटिंग सुरु होणार आहे. ही गोष्ट खुद्द अरबाज खानने स्पष्ट केली आहे.
सिनेमाला घेऊन अरबाज म्हणाला, ”होय, ‘दबंग 3’ एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र अजून लोकेशन्सबाबत निर्णय होणे बाकी आहे. आता मी फक्त ऐवढेच सांगू शकतो की यात सलमान खान काम करणार आहे आणि प्रभूदेवा याचे दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा नोएडा पोलिसांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असणार आहे.” या चित्रपटात पुन्हा एकदा सलमान आणि सोनाक्षीचीच जोडी जमणार आहे. याआधी सोनाक्षी सिन्हाने देखील या वर्षाच्या अखेरीस ‘दबंग 3’चे शूटिंग सुरु होणार असल्याचे सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या –