शाहरुख खानच्या मुलाचं फेसबुक अकाऊंट हॅक

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या शाहरुख खानच्या मुलाचं आर्यनचं सोशल अकाऊंट हॅक केल्याचं समोर आलं आहे.आर्यनचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं असून त्याने स्वत:ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर जर या अकाऊंटवरुन कोणतेही फोटो,पोस्ट किंवा मेसेज आले तर त्याकडे दुर्लक्ष करा असंही आर्यनने सांगितलं आहे.
‘माझं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. त्यामुळे जर या अकाऊंटवरुन कोणताही मेसेज किंवा फोटो, पोस्ट शेअर झाली,तर त्याकडे दुर्लक्ष करा’, अशी पोस्ट आर्यनने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे.
महत्वाच्या बातम्या –