ज्येष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी वेबसिरीजच्या माध्यमातून लोकांसमोर येणार

ज्येष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी ‘द सवाईकर केस’ या वेबसिरीजच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहेत. हिंदी आणि मराठी चित्रसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांचा या वेबसिरीजमध्ये समावेश आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या सीरिजचे काम सुरू होईल.

याबद्दल बोलताना अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘द सवाईकर केसमध्ये काम करणं हा फारच छान अनुभव आहे. हे कथानक अत्यंत रंजक आहे आणि अनेक उत्तमोत्तम कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. मला नेहमीच चौकटीबाहेरच्या व अनोख्या भूमिका करायच्या होत्या आणि ‘द सवाईकर केस’मधील माझ्या व्यक्तिरेखेला स्वत:चे असे काही पैलू आहेत, जे मी साकारण्याचा प्रयत्न करणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like