सुशांत प्रकरणी रिया चक्रवर्तीची कबुली म्हणाली….

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी चक्रवर्तीची सीबीआयकडून कसून चौकशी होत आहे. या चौकशीदरम्यान नवनवीन खुलासे दररोज होत आहेत. रियाच्या मोबाइल फोनमधून तिने डिलिट केलेले व्हॉट्स अॅप चॅट पुन्हा प्राप्त केले.
यात अमली पदार्थांबाबतही संवाद होते. या संदेशांबाबत ईडीने सीबीआयसह एनसीबीलाही माहिती दिली. ड्रग्सविषयीचे ते चॅट्स मीच टाइप केले होते, अशी कबुली रियाने दिली आहे.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी बुधवारी केंद्रीय एनसीबीनेरिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, ईडी आणि सीबीआय प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला.
रियाने आजवर अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही. मात्र तपासादरम्यान एनसीबीला रक्त किंवा अन्य चाचण्या आवश्यक वाटल्यास त्यासही ती तयार असल्याचे अॅड. मानेशिंदे यांनी सांगितले. रियाच्या फोनमधून मिळवलेल्या चॅट्समध्ये ती सॅम्युअल मिरांडासोबत ड्रग्सविषयी चर्चा करत असल्याची समोर आली. रियाचे हे रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी डिलिट केले होते. यातील पहिल्या संभाषणात ती गौरव आर्यासोबत ड्रग्सविषयी बोलताना दिसत आहे.