‘हा बालिशपणा कमी कर, आता तरी मोठा हो’; नेटकऱ्यांनी केली रणवीरवर टीका

रणवीर सिंगला त्याचा अतिउत्साहीपणा नडला. कार्यक्रमात स्टेजवर रॅप साँग गात असताना त्याने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक स्टेजवरून चाहत्यांच्या गर्दीत उडी मारली. गर्दीत अचानक उडी मारल्याने काही चाहतेसुद्धा जखमी झाल्याचं समजतंय. या घटनेत काही महिलासुद्धा जखमी झाल्याचं कळतंय.

या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर रणवीरवर टीका होऊ लागली आहे. ‘हा बालिशपणा कमी कर, आता तरी मोठा हो’, अशी कमेंट काही युजर्सनी केली आहे. तर लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी रणवीर काहीही करू शकतो अशीही टीका काहींनी केली.

महत्वाच्या बातम्या –

You might also like