रणबीर आणि नीतू सिंग कोरोना पॉझिटीव्ह ?

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. याच दरम्यान आता महाराष्ट्रात आणखी 8139 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 4360 जणांची प्रकृती सुधारुन डिस्चार्ज देण्यात आला असून 223 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढून आता 2,46,600 वर पोहचला आहे. त्यापैकी 99,202 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1,36,985 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकूण 10,116 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आहेत हे कळताच बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ माजली. या नंतर सोशल मीडियावर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याची बातमी पसरवली जात आहे. यातच रणबीर कपूर, नीतू सिंग कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याची बातमी पसरली.

या व्हायरल पोस्ट बाबत रणबीर कपूर, नीतू सिंग माध्यमांना सांगितले नसले तरी रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने इंस्टाग्रामवर पोस्ट करत संताप व्यक्त केला.रिद्धिमा कपूर लिहिले आहे की,‘केवळ लक्ष वेधण्यासाठी अशी बातमी दिली आहे का? अशा बातम्या पसरवण्याआधी खरे की खोट तरी तपासा. आम्ही ठीक आहोत आणि ठणठणरत आहोत. अफवा पसरवणे बंद करा,’ असे रिद्धिमाने लिहिले.

 

You might also like