प्रियांका चोप्राने आपले आत्मचरित्र लिहून केले पूर्ण

वयाच्या 17 व्या वर्षी ती “मिस इंडिया’ आणि त्यापाठोपाठ “मिस वर्ल्ड’देखील बनली. बॉलिवूडमध्ये जम बसवल्यावर तिने “क्‍वांटिगो’सारख्या नावाजलेल्या टीव्ही सीरिजमधून जगभरात आपली ओळख निर्माण केली. निर्मिती आणि युनिसेफची सदिच्छादूत म्हणूनही तिने आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

प्रियांका चोप्राने आपले आत्मचरित्र लिहून पूर्ण केले आहे. “अनफिनिश्‍ड’ हे आत्मचरित्र आपले लिहून पूर्ण झाले असल्याचे तिने ट्विट करून आपल्या फॅन्सना सांगितले. नुकतेच आपल्या चरित्राचा अखेरचे हस्तलिखित प्रकाशनासाठी पाठवले असल्याचे तिने म्हटले आहे. या चरित्रातील प्रत्येक शब्द आपल्या अनुभवावर आधारलेला आहे.

आपल्या आत्मशोधातून आणि जीवनाच्या प्रतिबिंबातून आपल्याला हे आत्मचरित्र लिहण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या “बकेट लिस्ट’मधील कामांच्या यादीवर जेंव्हा खूण केली जाते, तेंव्हा पूर्णत्वाचा आनंद मिळतो, असे तिने म्हटले आहे. प्रियांकाने आत्मचरित्र लिहीणार असल्याची घोषणा जुन 2018 मध्ये केली होती.

“अनफिनिश्‍ड’मध्ये काही निबंध, कलाकार, निर्माती, गायिका आणि युनिसेफची सदिच्छादूत म्हणून आलेले अनुभव, निरीक्षण आणि कथांचाही समावेश असणार आहे. प्रियांका चोप्राने एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये अनेक वैविध्यपूर्ण जबाबदाऱ्या आणि भूमिका पार पाडल्या आहेत.

 

 

You might also like