नसीरुद्दीन शाह आणि शाहिद कपूर आहेत नातेवाईक, ‘हे’ आहे त्यांचं नातं?

अनेक लोकप्रिय आणि गाजलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या नसीरुद्दीन शाहा यांचा आज वाढदिवस आहे. उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे जन्म झालेल्या नसीरुद्दीन यांच्या करिअरविषयी साऱ्यांनाच ठाऊक आहे. परंतु, त्यांच्या पर्सनल लाइफविषयी फार कमी जणांना माहित आहे. शाहिद कपूर आणि नसीरुद्दीन शाह हे एकमेकांचे नातेवाईक असल्याचं काही जणांना ठाऊक असेल.

नसीरुद्दीन शाह यांची दुसरी पत्नी रत्ना पाठक आणि शाहिद कपूरची सावत्र आई सुप्रिया पाठक या एकमेकींच्या सख्या बहिणी आहेत.नसीरुद्दीन यांनी वयाच्या २० व्या वर्षी पहिलं लग्न केलं होतं. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव  परवीन मुराद असं होतं. त्या त्यांच्यापेक्षा वयाने १५ वर्षांनी मोठ्या होत्या. परंतु, त्यांचं लग्न वर्षभरदेखील टिकू शकलं नाही. परवीन मुराद यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर नसीरुद्दीन यांनी रत्ना पाठक यांच्यासोबत लग्न केलं.

दुसरं लग्न करण्यापूर्वी नसीरुद्दीन आणि रत्ना पाठक हे बराच काळ लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रत्ना पाठक या नसीरुद्दीन यांच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान आहेत. या दोघांना इमाद आणि विवान अशी दोन मुलं आहेत.

दरम्यान, रत्ना पाठक या दीना पाठक यांची मुलगी असून पंकज कपूर यांची पत्नी सुप्रिया पाठक आणि रत्ना पाठक या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. त्यामुळे या नात्याने रत्ना पाठक या शाहिद कपूरच्या मावशी आहेत.

You might also like