माधुरी-जॅकलीनचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

 माधुरी दीक्षित आणि जॅकलिन फर्नांडिजचा एका थ्रोबॅक व्हिडिओने सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही अभिनेत्रींनी “एक दो तीन’ गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ फॅन पेजवरून इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये सलमान खानदेखील आहे.

दरम्यान, क्‍वारंटाईन काळावधीत नृत्य रसिकांना आपल्या घरातील एक विशिष्ट जागा निवडत नृत्यातील प्रतिभा दर्शविण्यासाठी एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची विनंती केली आहे. आगामी काळात माधुरी दीक्षित बऱ्याच मोठ्या प्रकल्पांमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे जॅकलिन फर्नांडिज “अलादीन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तथापि, सलमान खानसमवेत “किक’, सुशांतसिंह राजपूतसोबत “ड्राइव्ह’ चित्रपटात दिसली होती.

माधुरी दीक्षितच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास ती गतवर्षी “कलंक’ आणि “टोटल धमाल’मध्ये दिसली होती. तसेच माधुरी दीक्षित लवकरच एक रियलिटी शोमध्ये जज म्हणून परत येणार आहे. “डान्स दिवाने’ या रिऍलिटी शोच्या नवीन सीझनमध्ये ती दिसणार आहे.

 

You might also like