ईशा शिकवणार विक्रांतला धडा

‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेमध्ये आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. इतके दिवस ईशा निमकरला पडलेले स्वप्न खरे आहे की खोटे, याचा उलगडा होत असताना आता नुकतंच प्रसारीत झालेल्या भागात प्रेक्षकांनी पाहिलं की, ईशाच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे सिद्ध झाले आहे.
राजनंदिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि तिच्या मागच्या जन्माची देणी फेडण्यासाठी ईशाचा जन्म झाला आहे हे तिला उमगतं. आता ईशाने जयदीपच्या हाती व्यवसायाची सर्व सूत्र दिली आहेत. तसंच ऑफिसमध्ये परांजपे यांच्या मदतीने ती विक्रांतला धडा शिकवण्यासाठी योजना आखात आहे. ईशा विक्रांतला धडा शिकवेल का? विक्रांत त्याची चूक मान्य करेल का? झेंडे ईशाच्या जीवाला धोका तर नाहीना निर्माण करणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.