‘या’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार राहुल्या

आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या व्यक्तिमत्त्वाने आतापर्यंत सगळ्यांची मनं जिंकत आलेला राहुल्या आता रुपेरी पडदा गाजवायला सज्ज झाला आहे. ‘पळशीची पीटी’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये राहुल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तो विकास शिंगाडे नामक एका हवालदाराची भूमिका साकारणार आहे.

”आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. समोरच्याने आपल्यावर विश्वास दाखवत दिलेली नवनवीन कामं हेच मी माझं यश मानतो. दिग्दर्शक धोंडिबा बाळू कारंडे यांनी मला या चित्रपटासाठी विचारल्यानंतर माझा कॉन्फिडन्स तिपटीने वाढलाय,” असं राहुलने या भूमिकेविषयी सांगितलं. हा चित्रपट २३ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.