एकमेकांचं तोंडही पाहात नाहीत कुशल बद्रिके आणि भाऊ कदम; ‘हे’ आहे कारण

३ महिन्याच्या लॉकडाउन नंतर पुन्हा शूटिंग ला सुरवात झाली आहे. नुकतेच ‘चला हवा येऊ द्या’ शोचं शुटिंग  सुरु झालं आहे.ह कलाकारांची संपूर्ण टीम पुन्हा एकदा हसवण्यास सज्ज झाली आहे. सेटवर सगळी काळजी घेऊनच शुटिंगला सुरुवात केली आहे.

पण कुशल बद्रिकेच्या पोस्टने मात्र सर्वानांच आश्चर्यचकित केलं. कुशलने त्याचा आणि भाऊचा एक व्हिडियो पोस्ट केला आहे.या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘हल्ली आम्ही कामा व्यतिरिक्त एकमेकांची तोंड बघत नाही’ हे कॅप्शन वाचताना सिरियस वाटत असलं तरी बरंच मजेदार आहे.

या दोघांनाही करोनामुळे पुर्णवेळ मास्कमध्येच वावरावं लागतं. त्यामुळे प्रत्यक्ष चेहरा केवळ काम करतानाच पाहता येतो. त्यामुळे कुशलने अशी मजेदार कमेंट केली आहे. सध्या कुशलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतांना दिसून येत आहे. कुशलच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट सुद्धा केली आहे.

‘या’ अभिनेत्याला कोरोना झाल्याचं कळताच रामदास आठवलेंनी दिली प्रतिक्रिया

You might also like