वाचा….अमृता सिंगबद्दल काय म्हणाली करिना कपूर!

‘कॉफी विद करण 6‘च्या आखरी एपिसोडमध्ये करिना कपूर आणि प्रियंका चोप्रा यांनी हजेरी लावली. त्यावेळी करिना सैफ अली खानची एक्स वाईफ अमृता सिंग हिच्याबद्दल करिना बोलली. ‘
करणने अमृता सिंगबद्दल करिना कपूरला छेडले. अमृतासोबत तुझे नाते कसे आहे? असे करणने करिनाला विचारले. यावर तिने सांगितले की,सैफसोबत लग्न झाले तेव्हापासून मी एकदाही अमृताला भेटलेले नाही. पण मी अमृताचा प्रचंड आदर करते. ‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवर मी एकदा अमृताला भेटले होते. त्यावेळी अमृता साराला घेऊन माझ्याकडे आली होती. सारा माझी खूप मोठा फॅन होती. तिला मला भेटायचे होते. त्यावेळी मी व अमृता एकमेकींशी बोललो होतो. माझे पती सैफ अली खानच्या दोन्ही मुलांचे संगोपण अमृताने एकटीने केले. त्यामुळेच तिच्याबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे. सैफने मला प्रपोज केले, त्यावेळी माझी दोन मुले आहेत आणि ते माझ्या जीवनाचा भाग आहेत, असे सांगितले होते, असेही तिने सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
- चला एक नजर टाकूया यंदाच्या ऑस्कर विजेत्यांच्या संपूर्ण यादीवर
- मी ‘तिच्या’ सारखी महत्त्वकांशी नाही – करिना कपूर खान
- विक्रम गोखले झळकणार ‘या’ हिंदी मालिकेत
- श्रीदेवी यांच्या साठी जान्हवी कपूरने लिहिली एका भावुक पोस्ट