अभिनेता नव्हे ‘या’ क्षेत्रात जयचे होते सुनील शेट्टीला

सुनील शेट्टी बॉलिवूडमध्ये अनेक पिळदारयष्टी असलेला अभिनेता आहे. मात्र 90च्या दशकात बोटावर मोजता येतील इतकेच अभिनेते बॉडी बिल्डर होते. त्यातील एक नाव म्हणजे सुनील शेट्टी. तो आजही आपल्या बॉडीकडे खास लक्ष देतो आणि सोशल मीडियावर बॉडी-बिल्डिंगसाठी जनजागृतीही करतो.

“हेरा फेरी’, “ये तेरा घर ये मेरा घर’, “दे देना दन’ या चित्रपटांत त्याने कॉमेडी रोल साकारला आहे. 2001 साली आलेल्या “धडकन’ या चित्रपटासाठी सुनील शेट्टीला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. चित्रपटाशिवाय हॉटेल व्यवसायातही सुनील शेट्टीचे मोठे नाव आहे.

100 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केलेला सुनील शेट्टी आजकाल पडद्यावर कमीच दिसतो. चित्रपटांत आपल्या ऍक्‍शनने लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्याला “ऍक्‍टर नव्हे तर क्रिकेटर व्हायचे होते’, असे त्याने वाढदिनी सांगितले.

1992 मध्ये “बलवान’ हा त्याचा पहिला चित्रपट. 1994 मध्ये त्याच्या करिअरला “मोहरा’ या चित्रपटाने कलाटणी दिली. यानंतर “गोपी किशन’मध्ये त्याने डबल रोल केला. या ऍक्‍शन हिरोने चाहत्यांना खळखळून हसवलेही आहे.

 

You might also like