‘मी या नवीन कंगनाला ओळखत नाही’ ; अनुराग कश्यपने कंगनाला फटकारलं?

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांसह बॉलिवूड क्वीन कंगना रणौतने नेपोटिझम या विषयाला हात घातला. आणि सोशल मीडियावर आता मोठा वादंग निर्माण झाला आहे.इनसायडर-आउटसायडर या विषयावरून सोशल मीडियावर वाद रंगू लागले आहेत. त्यातच कंगनाने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे म्हटले होते की, तिने केलेले दावे जर ती सिद्ध करू शकली नाही तर ती मानाचा पद्मश्री सन्मान परत करेल.

दरम्यान या एकंदरित प्रकाराबाबत दिग्दर्शक अनुराग कश्यपने  मौन सोडले आहे. त्याने ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे आणि कंगनाची कानउघडणी केली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी या नवीन कंगनाला ओळखत नाही’. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘जर तिच्या परिवारातील सदस्य किंवा मित्रपरिवार हे नाही पाहू शकत की ती काय करतेय, तर खरंतर सध्या तिचं कुणीच असं जवळचं राहिलं नाही आहे’.

 

You might also like