दीपिकाने ‘मदर्स डे’ च्या निमित्ताने शेअर केला आईचा मजेशीर व्हिडिओ

दीपिका पदुकोणने नुकताच ‘मदर्स डे’च्या निमित्ताने तिच्या आईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिकाची आई एका कुटुंबातील व्यक्तीचा अभिनय करताना दिसत आहे. दीपिकाने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर आईचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओला दीपिकाने ‘तुम्ही पाहू शकता मझ्यात हे अभिनयाचे गुण कुठून मिळाले आहेत. मला हे गुण माझी मैत्रिण, मार्गदर्शक, अँकर, रोल मॉडलकडून मिळाले आहेत.’ अशाप्रकारचं कॅप्शनही तिने व्हिडिओला दिलं आहे. दीपिकाने या पोस्टमध्ये तिच्या सासूलाही टॅग केलं आहे.