‘या’ अभिनेत्याच्या घरात केली कोरोनाने एन्ट्री

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा  विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. याच दरम्यान आता महाराष्ट्रात आणखी 8139 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 4360 जणांची प्रकृती सुधारुन डिस्चार्ज देण्यात आला असून 223 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढून आता 2,46,600 वर पोहचला आहे. त्यापैकी 99,202 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1,36,985 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकूण 10,116 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील तीन जणांना करोनाची लागण झाली आहे. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. अनुपम खेर यांची आई दुलारी यांना करोनाची सौम्य लक्षणं असून कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर अनुपम खेर यांचे भाऊ राजू खेर, वहिनी व पुतणी यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अनुपम खेर यांनी स्वत: करोनाची चाचणी केली असून त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

“गेल्या काही दिवसांपासून माझ्या आईला भूक लागत नव्हती, काहीच खात नव्हती, दिवसभर झोपून राहत होती. म्हणून आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या रक्ताची चाचणी केली. रक्ताचा रिपोर्ट नॉर्मल होता. त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला त्यांचा सिटीस्कॅन करायला सांगितला. सिटीस्कॅनमध्ये त्यांना करोनाची लागण झाल्याचं समजलं. त्यानंतर लगेचच मी आणि माझ्या भावाने सिटीस्कॅन केला. त्यात माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि भावाचा पॉझिटिव्ह आला. भावाच्या कुटुंबीयांचीही चाचणी करण्यात आली. त्यात वहिनी आणि पुतणीलाही करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. आईला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून माझ्या भावाला आणि त्याच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. मी मुंबई महानगरपालिकेला याबद्दलची माहिती दिली असून ते उत्तमरित्या त्यांचं काम करत आहेत. मी तुम्हालासुद्धा सांगू इच्छितो की घरात जर कोणाला भूक लागत नसेल तर त्यांची करोना चाचणी करून घ्या. कारण मी फार वेळ विचार करत होतो की भूक का लागत नाहीये. डॉक्टरसुद्धा त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत”, असं त्यांनी या व्हिडीओत म्हटलंय.

दुसरीकडे, महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली झाली आहे. त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून माहिती दिली आहे तर त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांची टेस्ट करण्यात येत असून त्यांचे रिपोर्ट येणे अजून बाकी असल्याची माहिती बच्चन यांनी दिली आहे. तर ‘माझ्या संपर्कात मागील 10 दिवसांत जे लोक आले आहेत त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी’ असे आवाहन अमिताभ यांनी केली आहे.

बॉलीवूडच्या ‘या’ महान अभिनेत्रीच्याही घरात केला कोरोनाने शिरकाव

You might also like