बॉलीवूडच्या ‘या’ महान अभिनेत्रीच्याही घरात केला कोरोनाने शिरकाव

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे.कोरोना व्हायरसची लागण आतापर्यंत लाखो लोकांना झाली आहे. सध्या देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाखांहून अधिक झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात २४ तासांत सर्वाधिक २७ हजार ११४ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून ५१९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख २० हजार ९१६वर पोहोचला असून मृतांचा आकडा २२ हजार १२३ झाला आहे.

आतापर्यंत ५ लाख १५ हजार ३८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या २ लाख ८३ हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या व्हायरसच्या विळख्यात अनेक सेलिब्रेटी आणि त्यांच्या सोबत काम करणारे लोकं अडकल्याच दिसून येत आहे.

आता रेखा यांच्या घरातही कोरोनाने प्रवेश केला आहे. वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा ‘सी स्प्रिंग’ हा बंगला आहे. दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या सुरक्षारक्षकावर उपचार सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण परिसराला सॅनिटाइज केलं आहे.

याप्रकरणी रेखा यांच्याकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही. सुरक्षारक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच मुंबई महानगरपालिकेने रेखा यांचा मुंबईतील बंगला सील केला आहे. त्याचसोबत त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोन असल्याचा फलकही लावण्यात आले आहेत.

 

You might also like