दिव्याच्या मृत्यूच्या 27 वर्षानंतर साजिदच्या दुसऱ्या पत्नीचा मोठा खुलासा…

दिव्या भारतीच्या निधनाला 27 वर्षे झाली आहेत. अलीकडे साजिद नाडियाडवालाची दुसरी पत्नी वर्धा हिने दिव्य भारतीबाबत मोठा खुलासा केला आहे. वर्धाने सांगितले की आज दिव्या भारती आपल्यासोबत  नसूनही मनामध्ये आहे. मी कधीही दिव्याचे स्थान घेण्याचा प्रयत्न केला नाही असे वर्धाने देखील सांगितले.

वर्धा म्हणाली- साजिदने माझ्याशी दुसरे लग्न केले असेल. पण मी त्याच्या आयुष्यात कधीही दिव्याचे स्थान घेण्याचा प्रयत्न केला नाही. वर्धा पुढे म्हणाली की जेव्हा जेव्हा मुले चित्रपटात दिव्याला पाहतात तेव्हा ते तिला मोठी आई म्हणून संबोधतात. दिव्या भारतीचे वडील आजही साजिदला मुलाप्रमाणे वागवतात.

वर्धने पुढे सांगितले की साजिद अजूनही दिव्याच्या आईवडिलांना मुलासारखा भेटतो. दिव्याचे वडील आणि साजिद किती जवळ आहेत याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मी कधीही दिव्याची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी माझी स्वतःची जागा तयार केली आहे म्हणूनच मला ट्रोल करणे थांबवा. दिव्या सुद्धा माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

दिव्या भारतीने 10 मे 1992 रोजी साजिद नाडियाडवालाशी लग्न केले. दिव्या भारतीने आपला धर्म बदलून साजिदशी लग्न केले. त्याने तीचे नाव सना असे ठेवले होते. पण लग्नानंतर सुमारे 11 महिने दिव्या भारतीचे वयाच्या 19 व्या वर्षी मृत्यू झाला.असे म्हटले जाते की दिव्या भारती चा मृत्यू पाचव्या मजल्यावरून पडल्यामुळे झाला . मात्र आजपर्यंत तिच्या मृत्यूचे गूढ समोर आले नाही.

‘या’ मॉडेलला ऐश्वर्या आणि अभिषेकच लग्न होऊ द्यायचं नव्हतं

 

You might also like