‘अर्जुन रेड्डी’ म्हणतोय……. ‘मी का बघू कबीर सिंग?’

‘कबीर सिंग’ या चित्रपटातल्या शाहिदच्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय. या चित्रपटाने आतापर्यंत २५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक आहे. यामध्ये अभिनेता विजय देवरकोंडाने प्रमुख भूमिका केली होती.

या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजयला ‘कबीर सिंग’बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला की, “त्या चित्रपटात शाहिदने काम केले आहे. ती भूमिका तो जगला आहे. मला असं वाटतं की, या चित्रपटात मी बघावं असं काही नाहीये. मला चित्रपटाचे कथानक माहिती आहे. मी स्वतः या चित्रपटात काम केलंय तर मी पुन्हा हा चित्रपट का बघू ?”