रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेची पोस्ट

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली अटक करण्यात आली. रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ‘न्याय’ असं लिहित अंकिताने ही पोस्ट शेअर केली.
‘योगायोगाने किंवा नशिबाने काहीही घडत नाही. आपण आपल्या कृतीतून आपलं स्वतःचं नशिब तयार करतो. त्यालाच कर्म म्हणतात,’ अशी पोस्ट अंकिताने शेअर केली.
एनसीबीने रियाच्या अटकेची कारवाई केली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी रियाला अटक करण्यात आलं.