अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण

देशात आणि राज्यात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.तसंच देशातील करोनाबाधितांच्या संख्येनंही सहा लाखांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान,अनिल थत्ते यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. खुद्द अनिल थत्ते यांनीच एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

“सध्या मी रुग्णालयात असून मला करोनाची लागण झाली आहे,” असं अनिल थत्ते म्हणाले. गेले अनेक दिवस करोनाची लागण होऊ नये यासाठी मी वर्क फ्रॉम होम करत होतो. परंतु आज तो व्हायचा तेव्हा होणार तेव्हा होतोच या निष्कर्षाला मी आलो. एवढी काळजी घेऊनही जर करोना होणार असेल तर काय म्हणायचं. आता करोनाची भीती संपली. तसंच करोना सोबत मधुमेह वगैरे अन्य आजार असूनही प्रकृती उत्तम असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं,” असं ते म्हणाले. तसंच आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर प्लाझ्मा देण्याचाही संकल्प केला असल्याचं त्यांनी नमूद केलं.

‘आता कोणी पोलिसांच्या मृत्यूवर RIP म्हणणार नाही’

You might also like