महिला तुरुंग अधिकार्याच्या भूमिकेत झळकणार मुक्ता बर्वे

मुक्ता बर्वे लवकरच एका नव्या धाटणीच्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. ‘बंदिशाळा’ असं या चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. ‘बंदिशाळा’ या चित्रपटामध्ये मुक्ता मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. त्यामुळे तिची ही भूमिका पहाण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
हा चित्रपट येत्या २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मिलिंद लेले दिग्दर्शित हा चित्रपट महिलाप्रधान असून ‘बंदिशाळा’ या सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे. चित्रपटाची कथाही संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिली आहे. शांताई मोशन पिक्चर्स’ या संस्थेची ही पहिली निर्मिती आहे. स्वाती संजय पाटील या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.