अशी केली ‘मी पण सचिन’ साठी स्वप्नीलने मेहनत

स्वप्नील जोशी लवकरच एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. श्रेयस जाधव दिग्दर्शित ‘मी पण सचिन’ या आगामी चित्रपटामध्ये स्वप्नीलने एका क्रिकेटपटूची भूमिकेत  दिसणार आहे. विशेष म्हणजे या नव्या भूमिकेसाठी स्वप्नील प्रचंड मेहनत करत असून सध्या तो जीममध्ये घाम गाळत आहे. त्याचा वर्कआऊट करतानाचा असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

‘मी पण सचिन’मध्ये स्वप्नीलने तरुण आणि मध्यमवयीन अशा दोन प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्याला या भूमिकांसाठी तब्बल १५ किलो वजन कमी करावे लागले. खेळाडूची भूमिका निभावत असताना त्याला खेळाडूसारखेच दिसणे, वागणे, चालणे गरजेचे होते.

वजन कमी करण्यासाठी त्याला दिग्दर्शक श्रेयस जाधव नेही मदत केली.‘मी पण सचिन’ हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे या चित्रपटाचे निर्माता असून श्रेयश जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like