अभिनेता लॉफी पॉल व आय.सी. ए. सी. टी. च्या डान्सर्स चे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

आमदार मंदा म्हात्रे यांनी नुकतेच मुंबई मध्ये नवी मुंबई उत्सवाचे आयोजन केले होते. अभिनेता सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी या भव्य कार्यक्रमात सादरीकरण केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे असलेल्या या उत्सवाची सुरवात अभिनेता लॉफी पॉल व आय.सी. ए. सी. टी. च्या डान्सर्स च्या गणेश वंदनेने करण्यात आली.

देवा श्रीगणेशा गाण्यावर भरत नाट्यम नृत्य प्रकारामध्ये अभिनेता लॉफी पॉल आणि टीमने सादर केलेले नेत्रदीपक नृत्य पाहून उपस्थितांसोबतच मुख्यमंत्र्यानी देखील अभिनेता लॉफी पॉल व आय.सी. ए. सी. टी. च्या महागुरू मेरी पॉल, चेअरमन मॅक मोहन पॉल तसेच डान्सर्सचे  विशेष कौतुक केले.

आय.सी. ए. सी. टी. संस्था गेले ३० वर्षांपासून नवी मुंबई परिसरात नृत्य प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत असून आता पर्यंत तब्बल ४५ हजाराहून जास्त विद्यार्थी येथून प्रशिक्षण पूर्ण करून गेले आहेत.