युपी पोलिसांनी अक्षयच्या ‘मिशन मंगल’ सिनेमाबाबत केलं ‘हे’ विधान

‘मिशन मंगल’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे.

विशेष म्हणजे ‘मिशन मंगल’ची भुरळ उत्तर प्रदेश पोलिसांना पडली असून त्यांनी या चित्रपटाच्या टीमचा एक फोटो शेअर करत वाहतुकीचे नियम सांगितले आहेत. युपी पोलिसांनी मिशन मंगलच्या टीमचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षयकुमार आणि चित्रपटातील अन्य टीम दिसत असून त्यांनी हॅल्मेट घातलं आहे. या हॅल्मेटवर वाहतुकीचे काही नियम आणि वाहने जपून चालविण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

“मिशन मंगल’ची टीम वाहतुकीच्या नियमांचं अंतराळातदेखील उल्लंघन करत नाही. त्यामुळे त्यांचा आदर्श घ्या आणि रस्त्यावर गाडी चालविण्यापूर्वी स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्या”, असं कॅप्शन देत युपी पोलिसांनी हा फोटो शेअर केला आहे.

 

You might also like