‘तुला पाहते रे’ बंद होण्याच्या चर्चांवर सुबोध भावे म्हणतो….

‘तुला पाहते रे’ मालिका अल्पावधितच छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ठरली. सध्या ही मालिका बंद होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे यावर आता सुबोधनं खुद्द स्पष्टीकरण दिलं आहे.

‘ज्या मालिकेने मला प्रेम आणि आशीर्वाद दिला. झी मराठी आणि आमच्या निर्मात्यांनी पुन्हा तुमच्या समोर यायची संधी दिली ती मालिका तुला पाहते रे मालिका मी सोडत नाहीये किंवा ती मालिका अकाली बंद ही होत नाहीये.’ असं सुबोधनं ट्विट करत म्हटलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांची लाडकी मालिका ही सुरूच राहणार असून ही मालिका बंद होणार ही केवळ अफवा असल्याचं सुबोधनं स्पष्ट केलं आहे.

सुबोध एका युट्यूब चॅनलच्या मुलाखतीत आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि यावर्षी खूप कमी काम करणार आहे असे सोबोध म्हणाला होता. तेव्हापासून ही मालिका बंद होणार किंवा सुबोध प्रेक्षकांचा निरोप घेणार अशा चर्चा होत्या. मात्र सुबोधनं प्रेक्षकांची लाडकी मालिका सुरूच राहणार असं सांगत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like