नेहा कक्करने गायलेलं ‘हे’ गाणं ऐकून व्हाल थक्क

नेहा कक्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यावेळी ती अभिनेता सुशांत सिंह राजपुतमुळे चर्चेत आहे. सुशांतला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिने एक गाणं गायलं आहे. या गाण्याला युट्यूबवर तब्बल ७० लाख व्हूज मिळाले आहेत.
नेहाने सुशांतसाठी गायलेल्या या गाण्याचा व्हिडीओ आपल्या युट्यूब अकाउंटवर पोस्ट केला आहे. “ना मारेगी दीवानगी मेरी, ना मारेगी आवारगी मेरी, कि मारेगी ज़्यादा मुझे मौत से नाराज़गी तेरी” असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं गाऊन नेहाने सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे.