Trapped: ‘ट्रॅप्ड’ इंटरव्हलशिवाय दाखवला जाणार

‘ट्रॅप्ड’ सिनेमाच्या ट्रेलरमुळे या सिनेमाची कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली. या सिनेमातून एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. या अनुभवात कुठेही खंड पडू नये म्हणून या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी इंटरव्हलशिवाय खेळ दाखवला जाणार आहे. त्यामुळे या सिनेमाचा विनाखंड अनुभव घेता येणार आहे.
विक्रामादित्य मोटवाने दिग्दर्शित ‘ट्रॅप्ड’ या सिनेमाचा कालावधी एकूण 105 मिनिटांचा असून हा सिनेमा येत्या 17 मार्चला रिलीज होणार आहे. ‘Trapped’ हा सिनेमा एका अपार्टमेंटमध्ये अडकून पडलेल्या एका व्यक्तीची रोमांचक, थ्रिलर कथा आहे. हा व्यक्ती एका अपार्टमेंटमध्ये अडकला आहे आणि त्याच्याकडे ना पिण्यासाठी पाणी आहे, ना खाण्यासाठी अन्न, नाही इलेक्ट्रिसीटी. अशात तो त्याची सुटका कशी करतो. सुटका करतो का? हे दाखवण्यात आलं आहे. या सिनेमाला लगातार बघण्यात अधिक मजा आहे. इंटव्हलमुळे कॅरेक्टरच्या भावनांचा फिल घेता येणार नाही. त्यामुळेच इंटरव्हलशिवाय सिनेमा रिलीज केला जाणार आहे.
[jwplayer wE9acW2C]
इंटरव्हलशिवाय सिनेमा रिलीज करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी आमिर खान प्रॉडक्शनच्या ‘धोबी घाट’ या सिनेमावेळीही असाच रिलीज करण्यात आले होते.