थ्रिलर वेब सिरिज ‘माफिया’ चा ट्रेलर प्रदर्शित

लवकरच झी ५ वर एक मानसशास्त्र थ्रिलर ‘माफिया’वेब सिरिज प्रदर्शित होणार आहे. या वेब सिरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या वेब सिरिजच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना मित्रांच्या रीयूनियनची झलक दाखवण्यात आली आहे.

मित्रांचा एक ग्रुप जंगलात जाताना ट्रेलरच्या सुरवातीला दाखवण्यात आले आहे. हा ग्रुप ‘माफिया’ नावाचा  गेम खेळण्यास सुरुवात करतात. या ट्रेलच्या माध्यमातून दिग्दर्शकाने प्रेक्षकांना एक रहस्यमय कथा आणि मनोवैज्ञानिक थ्रिलर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यात 6 जणांची मुख्य भूमिका दाखवण्यात आली आहे.

माफिया वेब सिरिजचा प्रीमियर 10 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सिरिजचे निर्देशन बिरसा दासगुप्ता यांनी केलं असून SK मुव्हीज द्वारा निर्मित करण्यात आली आहे. या वेब सिरिजची रचना रोहन घोष व अरित्रा सेन यांनी केली आहे.

अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण

You might also like