मराठी वेब सिनेमा ‘संतुर्की’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली सुप्रसिद्ध मराठी वेब सीरीज ‘गावाकडच्या गोष्टी’ने एक नवं वळण घेतलं आहे. वेब सीरिजचे दोन पर्व जरी संपले असले तरी हा पूर्णविराम नाही. कोरी पाटी प्रोडक्शनच्या गावाकडच्या गोष्टीमधील लोकप्रिय जोडी ‘संत्या-सुरकी’ यांची प्रेमकथा प्रेक्षकांना नितीन पवार दिग्दर्शित ‘संतुर्की’ या वेब सिनेमाद्वारे पाहता येणार आहे.

मराठी मनोरंजन जगातील हा पहिलावहिला प्रयोग असून ‘व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य साधून टीजर प्रदर्शित केला होता. टीजरला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर सर्वत्र चर्चा रंगली ती फक्त ‘संतुर्कीची’! संतुर्की या वेब सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

 

संतुर्की