‘टोटल धमाल’मधील माकडीण साधीसुधी नसून हॉलिवूडमधील नावाजलेली सेलिब्रिटी

अजय देवगणच्या आगामी ‘टोटल धमाल’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या फोटोमध्ये अजयच्या खांद्यावर एक माकडीण बसल्याचं दिसून येत आहे. ही माकडीण साधीसुधी नसून हॉलिवूडमधील नावाजलेलं अॅनिमल सेलिब्रिटी असल्याचं समोर आलं.

‘टोटल धमाल’मधील ही माकडीण हॉलिवूडमध्ये ‘क्रिस्टल’ या नावाने प्रसिद्ध आहे. गेल्या २३ वर्षांपासून तिचा कलाविश्वामध्ये वावर आहे. ‘क्रिस्टल’ कॅपुचिन या जातीची आहे. तिने आतापर्यंत अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं असून ‘टोटल धमाल’च्या माध्यमातून ती पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

क्रिस्टल एक ट्रेंड मंकी असून ती सर्वसामान्य माणसांप्रमाणे वावरते. इतकंच नाही तर दैनंदिन जीवनातली कामही ती सराईतपणे करताना दिसते. विशेष म्हणजे तिला माणसांनी बोललेल्या गोष्टीही कळतात. तिच्या लोकप्रियतेमुळे ती एखाद्या आघाडीच्या अभिनेत्रींप्रमाणेच मानधन घेत असून आठ वर्षापूर्वी क्रिस्टलने एका मालिकेच्या प्रत्येक भागासाठी सात लाखाहून अधिक मानधन घेतल्याचं ‘टीव्ही गाईड मॅगझीन’मध्ये म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like