या 10 बॉलिवूड चित्रपटांनी गेल्या 10 वर्षात इतिहास रचला आहे…

गेल्या दशकात बॉलीवूडच्या बर्‍याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे आणि आम्ही तुमच्यासाठी 10 मोठ्या चित्रपटांची नावे घेऊन आलो आहोत ज्यांनी कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड तोडले  आहेत.

1) बाहुबली 2  

या यादीमध्ये भारताचा सर्वात मोठा सुपरस्टार प्रभासचा ‘बाहुबली 2’ चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 510 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. .या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व  रेकॉर्ड्स तोडले आहेत.

2) दंगल

दुसर्‍या क्रमांकाचा चित्रपट म्हणजे आमिर खानचा चित्रपट दंगल आहे. दंगल ही दोन कॉमनवेल्थ गोल्ड मेडल जिंकणाऱ्या बहिणींची कथा असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 374 कोटींचा व्यवसाय केला होता.

3) ‘टाइगर जिंदा है

तिसर्‍या क्रमांकावर सलमान खानचा चित्रपट ‘टायगर जिंदा है’ आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 340 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. हा सलमान खानच्या कारकीर्दीचा सर्वात मोठा चित्रपट होता.या चित्रपटात कतरिना कैफचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

4) पीके 

आमिर खानचा चित्रपट ‘पीके’ चौथ्या स्थानावर आहे . तो बर्‍याच वादातही होता हा चित्रपट  2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने  337 कोटींचा व्यवसाय केला होता.या चित्रपटात अनुष्का शर्माचीही भूमिका होती.

5) ‘संजू’

रणबीर कपूरचा ‘संजू’ हा चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे.या चित्रपटात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली होती. हा चित्रपट संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने  334 कोटींचा व्यवसाय केला होता.

6) बजरंगी भाईजान 

बजरंगी भाईजान हा चित्रपट सहाव्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 315 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.या चित्रपटात सलमान खान हनुमान भक्त आहे.

7) सुल्तान

सलमान खानचा चित्रपट सुलतान सातव्या क्रमांकावर आहे.या चित्रपटात अनुष्का शर्माची महत्त्वपूर्ण भूमिका होती.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा व्यवसाय केला होता.

8) वॉर

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा ”वॉर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 292 कोटी कमावण्यात यशस्वी झाला होता. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा हा पहिला चित्रपट होता.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता.

9) पद्मावत

नवव्या  क्रमांकावर संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ हा चित्रपट आहे.या चित्रपटात शाहिद कपूर, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी बरीच वादंग झाली होती. बॉक्स ऑफिसवर  28२ कोटी कमावण्यात हा चित्रपट यशस्वी झाला होता.

10) तानाजी: द अनसंग वारियर 

दहाव्या क्रमांकावर  अजय देवगनचा चित्रपट तानाजीः अनसंग वॉरियर आहे. बॉक्स ऑफिसवर 269 कोटी कमावण्यात हा चित्रपट यशस्वी झाला होता.या चित्रपटात सैफ अली खानचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

You might also like