एका वाईट बातमीनं आजचा दिवस सुरु झाला – अक्षय कुमार

 

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज पहाटे वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात निधन झाले. त्यांनी वयाच्या ७१ वर्षी जगाचा निरोप घेतला. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे. १७ जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करीत आहेत. अक्षय कुमार याने त्यांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. .

“महान कोरिओग्राफर सरोज खान यांच निधन झालं. एका वाईट बातमीनं आजचा दिवस सुरु झाला आहे. त्या डान्स इतक्या सोप्या पद्धतीने शिकवायच्या की डान्स करु शकेल. बॉलिवूडसाठी हा एक झटका आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना!” अशा आशयाचे ट्विट करुन अक्षय कुमारने सरोज खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

You might also like