आज आहे इम्रान हाश्मीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस

इम्रान हाश्मी याच्या पाच वर्षाच्या मुलाने कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली आहे. आयानला २०१४ साली मूत्रपिंडाचा कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते. या उपचाराअंती अयानचा कर्करोग बरा झाला आहे. अशी माहिती इम्रान सोशल मीडियावर दिली आहे.
इम्रानने ट्विटरवर अयानसोबतचा एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. इम्रान म्हणतो, ‘कर्करोगासारख्या अजाराशी सामना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेम, आशीर्वाद, आधार आणि विश्वास या गोष्टींची गरज असते. त्यामुळे या काळात आपण त्यांच्यासोबत असणं गरजेचं असतं’.
दरम्यान, अभिनेता इम्रान हाश्मीने अयानच्या या आजारपणाच्या काळात ‘द किस ऑफ लाईफ: हाऊ अ सुपरहिरो अँड माय सन डिफिटेड कॅन्सर’ हे पुस्तक लिहीलं. या पुस्तकात इमरानने अयानच्या कॅन्सरवरील उपचारादरम्यानचे अनुभव आणि प्रसंग कथन केले आहेत.
महत्वाच्या बातम्या –